पतौडी पॅलेसमध्ये साजरा झाला करिनाचा वाढदिवस, करिश्मा कपूरने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 05:15 PM2023-09-21T17:15:09+5:302023-09-21T17:28:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा आज ४३वा वाढदिवस आहे.

करिनानं तिचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला आहे.

अभिनेत्री करीना कपूर खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक करिश्मा कपूरने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवली आहे. करिनानं तिचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला.

करिश्मा कपूरनं बेबोचा केक कापतानाचा काही फोटो शेअर केलाय.

खास तिच्यासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. वाढदिवसाच्या पार्टीत करिनानं पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर करिश्मानेही पांढरा कुर्ता घातला होता.

करीना कपूर खानच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही बहिणींनी एन्जॉय केला.

करिश्माने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करीनाबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "नेहमीच तुझ्या बाजूने...कारण तू बेस्ट आहेस...लव्ह यू" असं कॅप्शन दिलं आहे.

करीना कपूरचा चित्रपट 'जाने जान' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात करीना कपूरशिवाय विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.