रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:08 PM2024-06-11T14:08:54+5:302024-06-11T14:09:35+5:30

चाहत्यांची लाडकी दीपिका पदुकोण गेल्या काही सिनेमांमध्ये सतत आईच्या भूमिकेत दिसत आहे.

Deepika Padukone playing mother to Prabhas in upcoming Kalki 2898 AD trailer out | रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

नाग अश्विन यांचा सायन्स फिक्शन 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD)चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन यांची सिनेमात महत्वाची भूमिका आहे. प्रभास यामध्ये कल्कीच्या अवतारात आहे. विशेष म्हणजे प्रभासला जन्म देणारी स्वत: दीपिका पदुकोणच (Deepika Padukone) असणार आहे. त्यामुळे सिनेमात दीपिका चक्क प्रभासच्या (Prabhas) आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. गंमत म्हणजे हे पहिल्यांदा नाहीए की दीपिका हिरोच्या आईच्या भूमिकेत आहे. 

चाहत्यांची लाडकी दीपिका पदुकोण गेल्या काही सिनेमांमध्ये सतत आईच्या भूमिकेत दिसत आहे. याकडे नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं. याआधी 'ब्रह्मास्त्र' नंतर 'जवान' सिनेमात ती आईच्या भूमिकेत दिसली होती. आता आगामी 'कल्कि 2898 एडी' मध्ये ती कल्किला जन्म देणारी आई आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये दीपिका पदुकोणचा छोटा कॅमिओ होता. शिवाच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरच्या लहानपणीची स्टोरी सांगताना त्याच्या आईची झलक दाखवण्यात येते. ती आई म्हणजे दीपिकाच आहे हे तेव्हाच प्रेक्षकांनी हेरलं होतं. दीपिका रणबीर कपूरच्या आईच्या भूमिकेत दिसली अशी सगळीकडेच चर्चा झाली. ब्रह्मास्त्र च्या पुढच्या भागात आता दीपिकाची महत्नपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमातही दीपिकाने चक्क शाहरुखच्या आईची भूमिका साकारली होती. 

'कल्कि'चा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर दीपिकाचीच चर्चा आहे. यात ती कल्की अवताराला जन्म देणार असून अमिताभ बच्चन तिचं संरक्षण करताना दिसतात. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले,'दीपिका एका महत्वपूर्ण अवताराला जन्म देणार आहे'.'दीपिका mother genre सिनेमांचा धडाकाच लावत आहे' अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. 

विशेष म्हणजे दीपिका खऱ्या आयुष्यातही प्रेग्नंट आहे. सप्टेंबर महिन्यात ती रणवीर सिंह आणि तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दोघांचे चाहते खूपत खूश आहेत. तसंच तिच्या 'कल्कि 2898 एडी' सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. 27 जून रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Deepika Padukone playing mother to Prabhas in upcoming Kalki 2898 AD trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.