सायली संजीवचं आडनाव माहितीये का? 'या' कारणामुळे लावते फक्त वडिलांचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:41 IST2023-04-27T18:37:36+5:302023-04-27T18:41:58+5:30
Sayali sanjeev: सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.

'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
या मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सायलीचा बस्ता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर गोष्ट एका पैठणीची हा सिनेमाही तिचा गाजला.
सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.
सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत ती झळकली होती.
सायली आज कलाविश्वात सायली संजीव या नावाने ओळखली जाते. मात्र, तिचं आडनाव फारसं कोणाला माहित नाही.
सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
त्यामुळेच सायली संजीवचं संपूर्ण नाव काय ते जाणून घेऊयात.
सायलीच्या वडिलांचं नाव संजीव आहे. त्यामुळे सायली संजीव असं नाव ती लावते.
सायलीचं आडनाव चांदोस्कर आहे. परंतु, तिला एवढं मोठं आडनाव नको होतं.
आपलं नाव लहान असावं असं तिला वाटायचं त्यामुळे तिने आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
सायलीने 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.