जयललिता यांच्या प्रेमात हरवून गेली होती ही व्यक्ती, गरमीने पाय भाजत होते तेव्हा उचलून घेतलं होतं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 12:24 IST2020-12-07T12:10:53+5:302020-12-07T12:24:25+5:30

एमजी रामचंद्रनसोबत त्यांची पहिली भेट शूटींग दरम्यानच झाली होती. आपल्या दुसऱ्या सिनेमातच जयललिता यांना रामचंद्रन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

दिवंगत अभिनेत्री जयललिता यांची पुण्यतिथी ५ डिसेंबरला झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या गेल्या. अनेक किस्से सांगितले गेले. त्या अशा निवडक राजकीय नेत्यांपैकी होत्या ज्यांनी लग्न केलं नाही. पण तमिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. एकदा शूटींगवेळी गरमीमुळे पाय भाजत असल्याने एमजीआर यांनी जयललिता यांना उचलून धरलं होतं.

एमजी रामचंद्रनसोबत त्यांची पहिली भेट शूटींग दरम्यानच झाली होती. आपल्या दुसऱ्या सिनेमातच जयललिता यांना रामचंद्रन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. जयललिता यांची बायोग्राफी 'अम्मा जर्नी फ्रॉम स्टार टू पॉलिटिकल क्वीन' लिहिणाऱ्या वासंतीनुसार, एमजीआरच्या मनात सुरूवातीपासून जयललिताबाबत सॉफ्ट कॉर्नर होता.

पण दोघांनी लग्न केलं नाही. कारण रामचंद्रन यांची आधीच तीन लग्ने झालेली होती. एका मुलाखतीत वासंतीने सांगितले होते की, एमजीआर सुरूवातीपासून जयललिताबाबत फॅसिनेटेड होते. जयललिता फार चांगली इंग्रजी बोलायच्या.

'शूटींगदरम्यान वेळ मिळाला तर जयललिता एका कोपऱ्या बसून इंग्रजी पुस्तके वाचत होत्या आणि कुणाशीही बोलत नव्हत्या. जया दिसायला गोरी आणि सुंदर होत्या. सामान्यपणे तामिळनाडूमध्ये इतक्या सुंदर मुली बघायला मिळत नाहीत'.

जयललिता यांनी स्वत: कुमुदन पत्रिकेत लिहिले होते की, 'कार पार्किंग थोडं दूर होती. उन्हामुळे जमीन गरम झाली होती. त्यामुळे पाय भाजत होते. त्या काहीच बोलू शकत नव्हत्या.

जयललिता म्हणाल्या होत्या की, एमजीआर यांना त्यांची ही अडचण समजून चुकली होती. आणि त्यामुळे त्यांनी मला लगेच उचलून घेतले. पुढे रामचंद्रन यांनी जयललिता यांना पक्षाची प्रोपोगंडा सेक्रेटरी निवडलं होतं. नंतर त्या राज्यसभा सदस्यही बनल्या होत्या.

मात्र, पक्षातील काही लोकांनी जयललिता यांना विरोध दर्शवला होता. आणि एमजीआर यांना जयललिता यांना पोस्टवरून काढावं लागलं होतं.