प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिका सोडण्याच्या विचारात; डोनाल्ड ट्रम्प ठरले कारण? म्हणाली- "आम्हाला बाहुलीप्रमाणे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:04 IST2026-01-27T13:51:52+5:302026-01-27T14:04:57+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या निर्णयांवर खूप टीका होताना दिसते. आता एक प्रसिद्ध अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या निर्णयांवर खूप टीका होताना दिसते. आता एक प्रसिद्ध अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे.

ट्वायलाईट या गाजलेल्या सिनेमा फ्रँचायझीमधील क्रिस्टन स्टीवर्टने हा खुलासा केला आहे. क्रिस्टन आता अमेरिका सोडण्याच्या विचारात असूत तिने ट्रम्प यांच्यावर टीकाही केली आहे.

"हॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना आजही स्वतंत्र ओळख दिली जात नाही. आम्हाला अनेकदा बाहुल्यांसारखी (Puppets) वागणूक दिली जाते.'', असं मोठं विधान क्रिस्टनने केलं आहे.

''काय बोलायचे, कसे वागायचे आणि पडद्यावर कसे दिसायचे, हे सर्व पुरुष ठरवतात. अभिनेत्रींची स्वतःची मते अनेकदा दाबून टाकली जातात.'', असाही खुलासा क्रिस्टनने केला आहे.

स्टीवर्टच्या मते, सिनेमा उद्योगात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आणि आदर मिळण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

"जेव्हा सत्तेत बसलेले लोकच महिलांच्या हक्कांचा आदर करत नाहीत, तेव्हा समाजात बदल घडणे कठीण होते," अशा शब्दांत तिने डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध नोंदवला आहे.

अशाप्रकारे क्रिस्टनने राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर आणि त्यांच्या महिलांविषयक दृष्टिकोनावर कडक शब्दांत टीका केली. यामुळे वैतागून क्रिस्टन अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे.

















