अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे 'हा' सिनेमा आला चर्चेत! सत्य घटनेवर आधारीत, IMDB वर ७.८ रेटिंग
By देवेंद्र जाधव | Updated: June 13, 2025 14:21 IST2025-06-13T14:06:34+5:302025-06-13T14:21:38+5:30
Society of the Snow Movie: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे एक सिनेमा सध्या चर्चेत आला असून सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे. हा सिनेमा कुठे बघू शकता? वाचा एका क्लिकवर

अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या दुर्घटनेमध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. या मोठ्या अपघातामुळे एक सिनेमा अचानक चर्चेत आला आहे
या सिनेमाचं नाव आहे 'सोसायटी ऑफ द स्नो'. मूळचा स्पॅनिश भाषेत असलेला हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे
१५ डिसेंबर २०२३ ला रिलीज झालेला हा सिनेमा सध्या ओटीटीवर उपलब्ध आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे हा सिनेमा चर्चेत आला असून लोकांना या सिनेमाची उत्सुकता आहे
या सिनेमाच्या कहाणीबद्दल सांगायचं कर, १९७२ साली उरुग्वेची रग्बी टीम प्रवास करत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडते. ते ज्या विमानातून प्रवास करतात त्या उरुग्वेयन एअर फोर्स ५७१ या विमानाचा अपघात होतो.
या विमानात ४५ जण असतात त्यापैकी २९ जण सुरुवातीला वाचतात. पण नंतर त्यातील काही जणांनाही त्यांचा जीव गमवावा लागतो. सिनेमातील प्रत्येक सीन अंगावर येणारा आहे
जे लोक वाचले असतात ते मृत पावलेल्या व्यक्तींचं मांस खाऊन आयुष्य जगतात. जगण्यासाठी प्रत्येकजण कसा संघर्ष करतो, याची भीषण कहाणी या सिनेमातून दिसतो.
'सोसायटी ऑफ द स्नो' हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर तुम्हाला बघायला मिळेल. IMDB वर या सिनेमाला ७.८ हे रेटिंग आहे.