जगातील सर्वात सुंदर महिला काळाच्या पडद्याआड, करिष्मा कपूरसोबतचं कनेक्शन माहित आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 12:35 IST2023-01-17T12:31:02+5:302023-01-17T12:35:56+5:30
इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांनी ९५ व्या अखेरचा श्वास घेतला. जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती.

जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळख असलेल्या इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचं आज निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे.
२०२१ मध्ये जीना यांच्या मांडीजवळील हाडाला दुखापत झाली होती. त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र आज अचानक त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
५० आणि ६० च्या दशकात त्यांनी युरोपियन सिनेमात काम केले. तिथूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखण्यात येऊ लागले. त्यांच्या सौदर्यावर चाहते घायाळ होते.
जीना लोलोब्रिगिडा यांना २० व्या शतकातील मोनालिसा असेही म्हणले जायचे. दुसऱ्या विश्व महायुद्धानंतर त्यांनी इटली मध्ये सिनेमा करायला सुरुवात केली. ट्रॅपिझ विथ बर्ट लॅंस्टर अॅंड टोनी कर्टिस, द हंचबॅक ऑफ नॉटरडॅम, सोलमन अॅंड शिबा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
काही काळ चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी फिल्ममेकिंग आणि फोटोग्राफी मध्ये करिअर केले. त्यांनी १९७३ मध्ये इटालिया मिया हे त्यांचे पहिले फोटोग्राफीचे पुस्तक प्रकाशित केले.
१९९३ मध्ये त्यांना फ्रेंच लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातही भूमिका केल्या. युरोप आणि अमेरिकेत त्यांनी फॅल्कॉन क्रेस्ट, डिसेप्शन्स मध्ये काम केले आहे.
त्यांचे टोपणनाव लोलो असे होते. त्यांच्या याच नावावरुन बॉलिवूडमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरलाही लोलो नाव पडले होते. करिष्माची आई बबिता यांची जीना आवडती अभिनेत्री होती. म्हणून करिष्माला ही लोलो नाव देण्यात आलेय.
जीना यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला होता. नंतर त्यांनी फोटोग्राफीतही यश मिळवलं.
जीना यांच्यावर वयाच्या १९ व्या वर्षी लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर त्या फार चर्चेत आल्या होत्या.