५६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने भारतीय गर्लफ्रेंडशी केला विवाह; पारंपरिक रितीरिवाजांनुसार बांधली लग्नगाठ

By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2026 13:03 IST2026-03-03T12:51:59+5:302026-03-03T13:03:19+5:30

प्रेम असावं तर असं! ५६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने भारतीय गर्लफ्रेंडशी भारतीय पारंपरिक रितींनुसार लग्न केलं आहे. अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रेम असावं तर असं! ५१ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने भारतीय गर्लफ्रेंडशी भारतीय पारंपरिक रितींनुसार लग्न केलं आहे. अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

हा अभिनेता आहे रिक सेगल. रिकने त्याची भारतीय गर्लफ्रेंड इंद्राणी मुखर्जीसोबत लग्नगाठ बांधली. रिक आणि इंद्राणी मुखर्जी यांचं लग्न खास ठरलं

५६ वर्षीय रिक सेगल यांनी भारतीय परंपरेनुसार हे लग्न केलं. खास बंगाली पद्धतीत हे लग्न झालं असून चाहत्यांनी या लग्नाचं कौतुक केलं.

रिकने बंगाली पद्धतीचा कुरता आणि धोतर परिधान केलं होतं. याशिवाय इंद्राणीने लाल रंगाची सुंदर लाल साडी परिधान केली होती. दोघांची जोडी खूप खास दिसत होती.

रिक आणि इंद्राणी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रिक गेली अनेक वर्ष भारतात राहत असून ते अनेक भारतीय कलाकारांच्या संपर्कात आहेत

रिक अमेरिकन अभिनेते असले तरीही गेल्या काही वर्षांपासून ते बॉलिवूडमधील काही इव्हेंटमध्ये आणि फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळत आहेत

रिक आणि इंद्राणीच्या लग्नाचे फोटो बघून अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रिक आणि इंद्राणी यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी त्यांना सदिच्छा दिल्या.