Baby's Day Out: जुळ्या भावंडांनी साकारलेला 'बेबीज डे आऊट'मधील 'बेबी'; आता दिसतात एकदम हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:42 IST2026-01-05T13:58:40+5:302026-01-05T15:42:03+5:30
'बेबीज डे आऊट' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. या सिनेमात 'बेबी'ची भूमिका साकारणारे अभिनेते आता ओळखूच येणार नाहीत इतके हँडसम दिसतात.

'बेबीज डे आऊट' हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा सिनेमा. या सिनेमातील क्यूट लहान मुलगा सर्वांना आवडला.

१९९४ साली आलेल्या 'बेबीज डे आऊट'मध्ये लहानग्या बेबीची भूमिका कोणी साकारेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या भूमिकेत एकाच वेळी जुळी भावंडं दिसली होती.

ॲडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या जुळ्या भावंडांनी यात भूमिका साकारली होती. हे दोघेही आता मोठे झाले असून त्यांना आपण ओळखूच शकत नाही इतके हँडसम दिसत आहेत.

अमेरिकेतील कामगार कायद्यानुसार लहान मुलांकडून जास्त वेळ काम करून घेता येत नाही, म्हणून निर्मात्यांनी जुळ्या भावंडांची निवड केली होती

हे दोन्ही भाऊ आता ३३ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९२ रोजी झाला होता. विशेष म्हणजे, 'बेबीज डे आऊट' हा त्यांच्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.

या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर न करता सामान्य आयुष्य जगणे पसंत केले. त्यापैकी जेकब हा शेफ आहे तर अॅडमने पुढे सामान्य आयुष्य जगणे पसंत केले.

'बेबीज डे आऊट' हा चित्रपट अमेरिकेपेक्षा भारतात जास्त गाजला होता. कोलकाता येथील एका चित्रपटगृहात हा चित्रपट सलग वर्षभर चालला होता.

















