Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:02 IST2026-03-18T15:41:35+5:302026-03-18T16:02:21+5:30
Gudi Padwa 2026 Special Bollywood Actress Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्रींनी गुढी पाडव्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या पैठणी साड्या परिधान केल्या आहेत. एका क्लिकवर बघा अभिनेत्रींचा पारंपरिक अंदाज

जान्हवी कपूरची लाल पैठणी साडी खूपच आकर्षक आहे. मॉडर्न ब्लाऊज आणि सॉफ्ट मेकअपमुळे जान्हवीचा लुक खास ठरतो. जान्हवी मॉडर्न आणि ट्रेडिशनल आउटफिटमध्ये किती सुंदर दिसते, हेच यातून पाहायला मिळतं.

भरजरी दागिने, मोत्यांची नथ आणि साजश्रृंगार करुन जिनिलीया देशमुख गुढीपाडव्यासाठी सज्ज आहे. तिचा हा लूक तरुणींसह महिलावर्ग नक्कीच फॉलो करु शकतात यात शंका नाही.

विद्या बालनने हिरव्या पैठणीसह भगव्या रंगाचा पदर असलेली सुंदर साडी नेसली आहे. साडीमधील नक्षीकाम आणि पारंपरिक दागिन्यांसह विद्याचा खूप देखणा आणि पारंपरित वाटतोय.

आलिया भटने पीच आणि पिंक शेड्समध्ये पैठणी साडीला एक नवीन आणि आकर्षक लुक दिला आहे. मिनिमल स्टाइलिंगमुळे आलियाची की खास स्टाइल खूपच फ्रेश वाटतेय.

श्रद्धा कपूरने जांभळ्या पैठणी साडीत साधा पण रॉयल लुक साकारला आहे. हलक्या दागिन्यांसह श्रद्धाचा लूक जरी साधासुधा असली तरीही या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय.

हिरवी साडी, लाल रंगाचा पदर आणि त्यावर मोराची नक्षी असलेली साडी मृणाल ठाकूरवर खूप खुलुन दिसतेय. मृणाल ठाकूरने परिधान केलेली नथ तिच्या लूकवर खुलून दिसतेय.

माधुरी दीक्षितची पिवळी पैठणी गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणाला साजेशी आहे. नथ, गजरा आणि सोन्याचे दागिने माधुरीच्या लुकला एकदम महाराष्ट्रीयन टच देतात.

















