बाप्पा मोरया! मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने घेतलं मुंबईतील गणपतींचं दर्शन, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:14 IST2024-09-09T14:14:29+5:302024-09-09T15:14:39+5:30

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवने मुंबईतील प्रमुख गणपती बाप्पांच्या मंडळांना भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर चर्चेत असते. रुचिराने गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील गणपती बाप्पाच्या मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं

रुचिरा जाधवचं चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळात खास स्वागत करण्यात आलं. रुचिराला खास पुष्पगुच्छ देण्यात आलं

रुचिराने मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी गणेशगल्लीमध्ये साकारलेल्लाय उज्जैन मंदिराच्या देखाव्याजवळ रुचिराने खास फोटोशूट केलं

रुचिरा जाधवने गणेशगल्लीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी गणरायाच्या मूर्तीजवळ रुचिराला फोटो काढायचा मोह आवरला नाही

रुचिराने मालिकेच्या शूटींगमधून वेळात वेळ काढून मुंबईतील प्रमुख गणपती बाप्पांच्या मंडळांना भेट दिली

रुचिराने सोशल मीडियावर हे खास फोटो शेअर केलेत. यात रुचिरा लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसतेय.

रुचिराने वडाळा येथील सुवर्णाधीश बाप्पा अशी ओळख असलेल्या GSB मंडळाच्या बाप्पाला भेट दिली. रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय