एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:56 IST2025-11-10T09:27:18+5:302025-11-10T11:56:19+5:30

अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं अगदीच मन जिंकणारं उत्तर दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. अमृता यांचा अनेक सामाजिक कार्यक्रमात सहभाग असतो.

पेशाने बँकर असलेल्या अमृता या एक उत्कृष्ट सिंगर आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली असून चाहत्यांच्याही ती पसंतीस उतरली आहेत.

अमृता यांनी नुकतीच 'द कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं.

या मुलाखतीत त्यांना "एक दिवस देवेंद्र फडणवीसांसोबत लाइफ स्वॅप करण्याची म्हणजेच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर सगळ्यात आधी काय कराल?" असा प्रश्न विचारण्यात आला.

अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं अगदीच मन जिंकणारं उत्तर दिलं.

त्या म्हणाल्या, "देवेंद्रजींनी एवढं सगळं काम केलं आहे की त्यामुळे संधी फारच कमी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनी इन्फ्रा डेव्हलपमेंट केली आहे".

"त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घातला आहे. ज्यामुळे लोक आता भ्रष्टाचार करायला घाबरतात कारण त्यांना भीती वाटते की आपण पकडले जाऊ. त्यांनी अनेक प्रोजेक्टचाही विचार केलेला आहे".

"पण, जर मी एक दिवस मुख्यमंत्री झाले तर मी सुट्टी घेऊन माझी पत्नी आणि मुलीला घेऊन चांगल्या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी जाईन", असं अमृता फडणवीस म्हणाल्या.