वैभव मांगलेच्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्यात मराठमोळ्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:09 PM2023-07-05T12:09:46+5:302023-07-05T12:14:45+5:30

Vaibhav Mangale : अभिनेता वैभव मांगलेने पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता वैभव मांगलेला कोणत्याही परिचयाची गरज नाही. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात छाप उमटविली आहे.

उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात.

सध्या तो चंद्रविलास मालिकेत काम करताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने भूताची भूमिका साकारली आहे.

मालिकेव्यतिरिक्त अभिनेता सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. दरम्यान आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता वैभव मांगलेने पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, यशस्वी सहजीवनाची १६ वर्षे पूर्ण . उत्तम साथीदार लाभण्या सारखं सुख नाही .भाग्य नाही. त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

वैभव मांगले सोशल मीडियावर बऱ्याचदा पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

वैभव मांगलेचा जन्म ७ जून, १९७५ रोजी देवरुख रत्नागिरी महाराष्ट्र येथे झाला.

मांगलेने आपल्या अभिनय कारकीर्दीला रंगभूमीपासून सुरुवात केली आणि १९९६ मध्ये हवालदार झाला. मुंबईचा पाहुणा या मराठी नाटकातून पदार्पण केले.

२००४मध्ये नवरा माझा नवसाचामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. अलबत्या गलबत्या नाटकातून त्याने साकारलेली चींची चेटकीण लहान मुलांना खूपच भावली.

स्वराज्य आणि कट्यार या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. एक डाव भटाचा हे त्यांचे गाजलेले व्यावसायिक नाटक आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त मांगलेने एक गाव भुताचा, मालवणी डेज, माझे पती सौभाग्यवती आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकेतही काम केले आहे.