'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेच्या सासूबाईंना पाहिलंत का?, त्या आहेत प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 09:00 IST2022-06-15T09:00:00+5:302022-06-15T09:00:02+5:30
Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या सासूने मराठी तसेच हिंदी मालिकेत काम केले आहे.

मराठी मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेत्री हृता दुर्गुळेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं मालिकेत काम करते आहे.
हृता दुर्गुळेने नुकतेच प्रतीक शाहसोबत लग्न केले आहे.
प्रतीक शाह प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक आहे. तर त्याची आई अभिनेत्री मुग्धा शाहदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा मालिकेतून चित्रपटातून अभिनय साकारला आहे.
हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी बहुतेकदा नायक नायिकेच्या आईची भूमिका त्याचप्रमाणे विरोधी भूमिका देखील निभावल्या आहेत.
तर मराठी चित्रपटात देखील त्यांनी सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात.
मुग्धा यांनी मराठी, हिंदी बरोबरच गुजराती मनोरंजन विश्वातही लोकप्रियता मिळवली आहे.
इतकेच नाही तर हृतानेदेखील मुग्धा यांच्यासोबत काम केले आहे.