...म्हणून त्या लोकप्रिय अभिनेत्रीनं दिली होती स्वतःच्याच हत्येची सुपारी, चाकूचा संग्रह करण्याची आवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:09 IST2025-06-04T16:59:19+5:302025-06-04T17:09:34+5:30

लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वतःच्याच हत्येची सुपारी दिली होती

हॉलिवूडच्या सर्वात दिग्गजांमधील एक अभिनेत्री असलेली अँजोलिना जॉली फॅशन आणि ब्युटीच्या दुनियेतही लोकप्रिय आहे.

सौंदर्य आणि चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे.

फार कमी लोकांना माहिती आहे की अभिनेत्रीला चाकूचा संग्रह करण्याची आवड आहे. एवढंच नाही तर तिनं एकदा स्वतःच्याच हत्येची सुपारी दिली होती.

कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेली अँजेलिना हिचे वडील जॉन व्हाईट हे हॉलिवूड अभिनेता होते. त्यामुळं तिनं लहानपणीचं अभिनयाला सुरुवात केली होती.

ती पहिल्यांदाच तिचे वडील जॉन व्होइट यांच्यासोबत 'लुकिंग टू गेट आउट' (१९८२) या चित्रपटात बाल कलाकार म्हणून पडद्यावर दिसली होती. तेव्हा ती फक्त ७ वर्षांची होती.

मीडिया रिपोर्टनुसार, २० वर्षांची असताना ती अत्यंत नैराश्यात होती आणि आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला होता. स्वतःच्याच हत्येची सुपारी तिनं दिली होती. मात्र तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला होता.

अभिनेत्रीने IMDB ला दिलेल्या मुलाखतीत आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत खुलासा केला. तिने सांगितले, "मी कॉन्ट्रॅक्ट किलरची नेमणूक केली होती, कारण मला असं वाटायचं की माझा मृत्यू स्वतः माझ्या हातून होण्यापेक्षा कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केला तर माझ्या कुटुंबीयांना ते दुःख सहन करणे सोपे जाईल".

अँजेलिना जोलीची संपत्ती ही ९९६ कोटी रुपयांची आहे. तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तिनं तीन वेळा लग्न केलं आहे आणि तिन्ही लग्नं अपयशी ठरली आहेत. ती ६ मुलांची आई आहे.

अँजेलिना जोलीने ३ दशकांच्या करिअरमध्ये २ ऑस्कर आणि २ गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आहेत.

जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून तिचं कौतुक होतं. तिच्या ओठांना जगातील परिपूर्ण ओठ मानलं जातं.