कुठे आहे 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण? आता तिच्या लूकमध्ये झालाय मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:30 IST2023-09-07T11:45:22+5:302023-09-07T13:30:48+5:30
Janmashtami 2023: 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणारा तो छोटा कृष्ण आठवतोय का? या बाळकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.

2008 साली छोट्या पडद्यावरची एक पौराणिक मालिका चांगलीच गाजली. या मालिकेचे नाव ‘जय श्री कृष्ण’ (Jai Shri Krishna). गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर या मालिकेची नेहमीच आठवण येते आणि या मालिकेतील छोटा कृष्णही तेवढाच आठवतो.
या बाळकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. मालिकेतील ही बाळकृष्णाची भूमिका साकारणारा मुलगा नसून मुलगी होती. तिचे नाव धृती भाटिया (Dhriti Bhatia). ‘जय श्री कृष्ण’ मालिकेत बालकृष्णाची भूमिका साकारणारी ही धृती आता चांगलीच मोठी झाली आहे.
मालिकेत भूमिका साकारली तेव्हा ती केवळ तीन वर्षांची होती. आता तिला पाहाल तर हीच ती हे पाहून जरा आश्चर्याचा धक्का बसेल.
श्रीकृष्णाच्या बाललीला धृतीने पडद्यावर अगदी उत्तम साकारल्या. तोच नटखटपणा, निरागसता, हावभाव या बालकलाकाराने अतिशय उत्तमपणे साकारले होते.
श्रीकृष्णाच्या भूमिकेतील धृती अगदी शोभून दिसत होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले. 'जय श्री कृष्णा' ही मालिका कलर्स वाहिनीवर 2008 साली प्रसारित झाली होती.
मालिकेत काम करत असताना धृती फारच लोकप्रिय झाली होती. अगदी ती जिथे जायची तिथे तिच्याभोवती लोकांचा गराडा पडायचा. लोक अगदी भक्तीभावाने तिला भेटायला यायचे. अगदी बालकृष्ण म्हणून तिचे लाड करायचे.
आता ही मालिका संपून बरीच वर्षे झालीत. पण तिचा तो गोड चेहरा लोक विसरलेले नाहीत. या मालिकेनंतर धृतीने ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतही काम केले होते. शिवाय ‘माता की चौकी’ या मालिकेतही ती झळकली होती.
सध्या धृतीने मालिकांपासून दूर राहत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आहे. तिचे वडील बिझनेसमॅन असून आई कोरिओग्राफर आहे. आईप्रमाणेच धृतीलाही नृत्याची आवड आहे आणि भविष्यात कोरिओग्राफर व्हायची तिची इच्छा आहे.