पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला दाऊद इब्राहिम, बॉलिवूड निर्मात्याने सिनेमा नाकारल्यावर काटाच काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:26 IST2026-03-21T16:18:30+5:302026-03-21T16:26:01+5:30
पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूबच्या प्रेमात दाऊद वेडा झाला होता. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती भारतात आली होती.

धुरंधर २मुळे पुन्हा एकदा गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेला दाऊद इब्राहिम चर्चेत आला आहे. धुरंधरमध्ये बडे साहब म्हणून दाऊदचा उल्लेख केला आहे.

भारतात झालेल्या बॉम्बब्लास्ट आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदचा हात होता. मुंबईमध्ये त्याची दहशत होती.

एवढंच नव्हे तर दाऊद बॉलिवूडवरही राज्य करत होता. अनेक सेलिब्रिटींशी त्याचे संबंध होते. काही बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही दाऊदचं नाव जोडलं गेलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्रींसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या. मंदाकिनी, जैस्मिन धुन्ना, मेहविश हयात या अभिनेत्रींसोबत त्याचे फोटो व्हायरल झाले होते.

पण पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूबच्या प्रेमात दाऊद वेडा झाला होता. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती भारतात आली होती.

पाकिस्तानी असूनही तिला दाऊदमुळे अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका मिळाल्या होत्या.

बॉलिवूड निर्माता जावेद सिद्दीकीने अनिता अयुबला त्याच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. तेव्हा दाऊदने त्याची हत्या केली होती.

अनिता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले होते. पाकिस्तानातीलच एका मॅगझिनने "बॉलिवूडमधली पाकिस्तानी स्पाय" असा तिचा उल्लेख केला होता.

त्यामुळे तिची प्रतिमा मलीन झाली आणि बॉलिवूडमध्ये तिला काम मिळणं कठीण झालं.

अनिता अयुबने गुजराती बिजनेसमॅन सौमिल पटेलसोबत लग्न करत संसार थाटला. मात्र काही वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला.

त्यानंतर अनिताने पाकिस्तानी बिजनेसमॅन सुबक मजीदसोबत लग्न केलं. आता ती न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली असून तिला एक मुलगा आहे.

















