बाळ शिवबाच्या रुपात मायरा वायकुळचा भाऊ, चिमुकल्याच्या फोटोशूटनं जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:15 IST2025-02-17T15:56:29+5:302025-02-17T16:15:02+5:30

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहचलेली बालकलाकार मायरा वायकुळ ही कायम चर्चेत असते.

आता फक्त मायराचं नाही तर तिचा भाऊदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.

मायराचा छोटा भाऊ (Myra Vaikul Brother) व्योम वायकुळचं नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025) बाळ शिवबाच्या रुपात फोटोशूट केलं आहे.

बाळ शिवबाच्या रुपातील व्योमच्या या फोटोशूटनं सर्वांची मन जिंकली आहेत.

त्याचे हे फोटोशूट पसंत पडले असून व्हायरल होत आहे.

'सिंहासनाधिश्वर' आणि 'श्रीमंत योगी' असे कॅप्शन या फोटोशूटला दिलं आहे.

इंग्रजी कालनिर्णयानुसार महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी (Shivneri Fort) किल्ल्यावर महराजांचा जन्म झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात उत्साहात साजरी केली जाते.