Cannes 2019 : कान्समध्ये बोल्ड अदांनी घायाळ केल्यानंतर कंगना रानौतचा पार्टी लूकही राहिला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 20:37 IST2019-05-17T20:34:01+5:302019-05-17T20:37:30+5:30

कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली.

कंगनाने कान्स लूकसाठी डिझाईनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कस्टर कॉरसेटची निवड केली.

कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये कंगना गोल्डन कलरच्या साडीत दिसली.

माधुर्य क्रिएशन्सने डिझाईन केलेल्या कांजीवरम साडीत तिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली.

गोल्डन कांजीवरम साडीसोबत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास होती. केवळ इतकेच नाही तर यासोबत कंगनाने काळा चष्माही कॅरी केला होता.

कंगनाने आपल्या कान्स लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लोकांना या इंटरनॅशनल इव्हेंटमधील कंगनाचा लूक इतका आवडला की, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकची प्रशंसा केली.

बॉलिवूडच्या या क्वीनने आपल्या रॉयल लूकने अनेकांची मने जिंकली.