ही तर गुलाबाची कळीच; जरीन खानचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:20 IST2024-04-08T15:13:21+5:302024-04-08T15:20:03+5:30
जरीन खानने गुलाबी ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

'वीर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण करणारी जरीन खान साऱ्यांनाच आठवत असेल.
सलमान खानने जरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. ती मोजून काही मोजक्याच सिनेमांमध्ये झळकली.
बऱ्याचदा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूकची चर्चा रंगली. यातच आता पुन्हा जरीन खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
जरीन खान सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते.
जरीन खानने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यातील निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जरीन खानने फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
जरीन खानने एकापेक्षा एक पोज देत चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
जरीन खानला सिनेमांमध्ये फारसं यश आलं नाही. त्यानंतर ती काही म्युझिक अल्बममध्येही झळकली.
जरीन सध्या कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर तिचा चांगला वावर आहे.
जरीन बऱ्यापैकी कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिला लोक कतरिनाची कार्बन कॉपी म्हणतात.