Year Ender 2020 : बॉलिवूडमधील या कलाकारांनी २०२० मध्ये घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:51 PM2020-12-28T17:51:15+5:302020-12-28T17:51:15+5:30

२०२० मध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे निधन झाले. सुशांत सिंग रजपूत, इरफान खान, ऋषी कपूर यांसारख्या कलाकारांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.

२९ एप्रिल २०२० ला इरफान खान यांचे निधन झाले. त्यांना २०१८ मध्ये न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर झाला होता. त्यावर त्यांनी लंडनमध्ये उपचार घेतले होते. त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर ते भारतात परतले. पण त्यांची अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचे निधन झाले.

ऋषी कपूर यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यावर त्यांनी अनेक महिने अमेरिकेत उपचार घेतला होता. पण ३० एप्रिलला ऋषी कपूर यांचे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले.

संगीत दिग्दर्शक वाजिद खान यांचे वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी निधन झाले. वाजिद हे किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे निधन १ जूनला झाले.

१४ जून २०२० ला सुशांत सिंगने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.

सौमित्र चटर्जी यांनी अपुर संसार आणि चारूलता यांसारख्या अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे वृद्धापकाळाने १५ नोव्हेंबरला निधन झाले.

प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे २५ सप्टेंबरला निधन झाले.

सरोज खान यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.