नाकात नथ, पायात पैजण..., 'परम सुंदरी' जान्हवी कपूरच्या साडीतल्या अदांवर घायाळ झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:10 IST2025-02-08T17:07:21+5:302025-02-08T17:10:35+5:30

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या लूकनेही तिच्या चाहत्यांना नेहमीच वेड लावते. पाश्चात्य असो वा भारतीय, अभिनेत्री प्रत्येक पोशाखात अप्रतिम दिसते.

जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या लूकनेही तिच्या चाहत्यांना नेहमीच वेड लावते. पाश्चात्य असो वा भारतीय, अभिनेत्री प्रत्येक पोशाखात अप्रतिम दिसते.

अलिकडेच, जान्हवी फ्लोरल साडी घालून बोटमध्ये पोज देताना दिसली होती तिचे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीचा देसी अवतार पाहायला मिळाला.

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बोटीत बसून नदीत फिरताना दिसत आहे. फोटोत अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत आहे.

जान्हवी कपूरने नाकात नथ, कपाळावर बिंदी, पायात पैंजण, कानात लहान झुमके आणि साजेसा मेकअपसह तिचा सुंदर लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. जान्हवीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले, ' सुंदरी तिच्या नैसर्गिक अधिवासात'

यापूर्वी जान्हवी कपूर पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली होती. तिचा हा लूक पाहून चाहते खूपच प्रभावित झाले होते.

जान्हवीने ही साडी डीपनेक ब्लाउजसह परिधान केला होता. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या पोझ देताना दिसत होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर शेवटची 'देवरा' चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिने पहिल्यांदा ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर केली होती.