तब्बू वापरत नाही वडिलांचं आडनाव, तुम्हाला तिचं पुर्ण नाव माहितेय का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:20 PM2024-05-06T17:20:49+5:302024-05-06T17:28:52+5:30

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री तब्बूने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची कारकीर्द आतापर्यंत यशस्वी राहिली आहे.

तब्बू एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. तिने केवळ आपल्या दमदार अभिनयानेच नव्हे तर आपल्या साधेपणाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.

सोशल मीडियावर देखील तब्बूच्या चाहत्यांची कमी नाही. पण तिचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत आहे.

तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादी मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव जमाल अली हाश्मी आणि आईचे नाव रिजवाना होतं.

दमदार अदाकारीने आणि सदाबहार सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. पण, ती तब्बू वडिलांचं आडनाव लावत नाही. कारण, लहानपणीच तब्बूच्या आई-वडिलांचा लहानपणी घटस्फोट झाला. त्यामुळे आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावण्याची गरज तिला कधीच वाटली नाही.

बालकलाकार म्हणून तिने सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. 1980 साली आलेल्या ‘बाजार’ सिनेमाच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने 1985 मध्ये आलेल्या ‘हम नौजवान’ या सिनेमात अभिनेता देव आनंदसोबत काम केलं.

तब्बूने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. २०२२ मध्ये तब्बूला सर्वात लकी अभिनेत्री म्हणून संबोधण्यात आलं होतं. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट 'भूल भुलैया २' आणि 'दृश्यम २' या दोन्ही चित्रपटांमध्ये तब्बू होती.

अभिनयासोबत प्रेमप्रकरणामुळे तब्बू कायम चर्चेत राहिली आहे. अद्याप तब्बूने लग्न केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तब्बू आणि नागार्जुन १० वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण अखेर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'क्रू' हा सिनेमा नुकतेच प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

तब्बू आज कोट्यवधींची मालकीन आहे. एका सिनेमासाठी ती 2 ते 4 कोटी मानधन घेते. मुंबई, हैदराबादसह गोव्यातदेखील तब्बूचा आलिशान बंगला आहे.