किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:14 PM2021-08-16T17:14:43+5:302021-08-16T17:30:21+5:30

अशात अनवरने महमूदला त्या मुलाची ओळख करून द्यायचा विचार केला. पण नशेत असलेल्या महमूद यांना काहीच समजलं नाही.

अमिताभ बच्चन आणि दिवंगत राजीव गांधी यांची इलाहाबादपासूनच चांगली मैत्री होती. गांधी आणि बच्चन परिवार आधी इलाहाबादमध्येच राहत होते.

राजीव आणि अमिताभ यांची पहिली भेट अमिताभ यांच्या वाढदिवसाला झाली होती. तेव्हा अमिताभ ४ वर्षांचे होते तर राजीव हे २ वर्षांचे होते. यावेळी इंदिरा गांधी राजीव यांना कडेवर घेऊन अमिताभ यांच्या चौथ्या वाढदिवसाला पोहोचल्या होत्या.

अमिताभ बच्चन जेव्हा बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते तेव्हा राजीव गांधी त्यांना साथ देत होते. अमिताभ बच्चन यांना राजकारणात आणण्याचं श्रेयही राजीव गांधी यांनाच जातं.

जेव्हा ते कॉंग्रेस तिकीटावर इलाहाबादमधून उभे राहिले तेव्हा ते जिंकले सुद्धा. मात्र, बोफोर्सनंतर अमिताभ हे राजकारणापासून दूर झाले. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी गांधी परिवारापासून अंतर ठेवलं. पण त्यांची मैत्री कामय राहिली.

अमिताभ बच्चन जेव्हा बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते. तेव्हा ते मुंबईला शिफ्ट झाले. तेव्हा त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की, ते मोठा फ्लॅट खरेदी करू शकतील.

तेव्हा अमिताभ प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महमूद यांचे भाऊ अनवर यांच्यासोबत रूम शेअर करून राहत होते. अनवरचा रूम पार्टनर असल्याने अमिताभ आणि महमूद यांचं चांगलं पटत होतं. अनेकदा ते एकत्र बसून गप्पा करत होते.

Scoopwoop च्या एका रिपोर्टनुसार, अशाच एका सायंकाळी अमिताभ बच्चन एका स्मार्ट-गोऱ्या मुलाला घेऊन अनवरच्या रूमवर पोहोचले. यावेळी महमूदही फ्लॅटमध्ये होते. अमिताभ यांचा मित्र असल्याने अनवरचीही त्याच्याशी ओळख होती.

अशात अनवरने महमूदला त्या मुलाची ओळख करून द्यायचा विचार केला. पण नशेत असलेल्या महमूद यांना काहीच समजलं नाही. इतक्यात महमूद यांनी खिशातून ५ हजार रूपये काढून त्या मुलाच्या म्हणजे अमिताभच्या मित्राच्या हातात ठेवले.

महमूद त्यावेळी अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माताही होते. त्यामुळे त्यांना वाटलं की, अमिताभने एखाद्या स्ट्रगल करणाऱ्या मित्राला सोबत आणलं असेल. पण हा स्ट्रगलर काही सामान्य माणूस नव्हता. तर तो देशाच्या पंतप्रधानाची मुलगा राजीव गांधी होता.

यादरम्यान कुणी काही बोलायच्या आत महमूद जोशमध्ये येत म्हणाले की, ''ये लड़का अमिताभ से कहीं ज़्यादा गोरा-चिट्टा और स्मार्ट है. देखना ये एक दिन बहुत बड़ा इंटरनेशनल स्टार बनेगा'.

तेव्हा महमूद यांनी खिशातून ५ हजार रूपये काढले आणि राजीव गांधी यांच्या हातावर ठेवले होते. पैसे देत ते म्हणाले की, ''ये 5000 रुपये तुम्हारे लिए मेरे अगले प्रोजेक्ट में काम करने के लिए बतौर साइनिंग अमाउंट है'.

हे सगळं बघून राजीव गांधी, अमिताभ बच्चन आणि अनवर हैराण झाले. नंतर नशा उतरल्यावर महमूद यांना राजीव गांधी यांच्याबद्दल सांगण्यात आलं. त्यानंतर सगळे जण लोटपोट होऊन हसू लागले होते.