"अमिताभ फक्त माझे आहेत", लग्नानंतर पतीचं अफेअर, जया बच्चन यांनी रेखाला घरी बोलवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:24 IST2025-03-26T13:40:37+5:302025-03-26T14:24:36+5:30
अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल जया बच्चन यांनाही माहीत होतं. आणि पतीचं अफेअर थांबवण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं.

जया-अमिताभ-रेखा...बॉलिवूडमधील हे लव्ह ट्रँगल प्रचंड गाजलं. ७०-८०च्या दशकातील अमितभा-रेखा यांच्या लव्हस्टोरीची आजही प्रचंड चर्चा होते
अमिताभ यांनी रेखा यांच्यासोबतचं नातं कधीच उघडपणे मान्य केलं नाही. पण, रेखा मात्र अनेकदा उघडपणे त्यांचं प्रेम नाव न घेता व्यक्त करतात.
विवाहित असूनही अमिताभ रेखा यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. याबाबत लेखक आणि मनोरंजन विश्वातील जाणकार हानिफ झवेरी यांनी मेरी सहेली या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं.
ते म्हणाले, "दो अंजाने सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ यांच्यातील जवळीक वाढली होती. ते खूप जवळ आले होते. ते प्रेमात कसे पडले ते मला माहीत नाही पण ते १०० टक्के एकमेकांच्या प्रेमात होते".
"पण, अमिताभ बच्चन यांच्या कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर चित्र बदललं आणि मग ते बायकोकडे वळले".
अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल जया बच्चन यांनाही माहीत होतं. आणि पतीचं अफेअर थांबवण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं.
जया बच्चन यांनी एकदा रेखा यांना घरी जेवायला बोलवलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन घरी नव्हते.
जया बच्चन यांनी रेखा यांना छान जेवू घातलं आणि त्यांच्याशी छान गप्पाही मारल्या. मात्र शेवटी निरोप घेताना जया बच्चन असं काही बोलल्या की तिथेच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्हस्टोरीचा द एण्ड झाला.
जया बच्चन यांनी रेखाकडे पाहिलं अन् म्हणाल्या "अमिताभ फक्त माझे आहेत. ते माझे होते आणि राहतील".
जया बच्चन यांच्या या वाक्यानंतर रेखा यांनी अमिताभ यांच्याशी असलेलं नातं तोडलं. आणि त्या त्यांच्यापासून दूर राहू लागल्या, असंही झवेरी यांनी सांगितलं.