Wedding 2023: मलायका-अर्जुन ते अथिया-केएल राहुल, नवीन वर्षात हे सेलिब्रेटी कपल्स बांधणार लग्नगाठ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:43 PM2022-12-29T13:43:29+5:302022-12-29T13:51:03+5:30

Bollywood Actors Wedding 2023: बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे आहेत जे पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्नासाठी सज्ज आहेत.

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे आहेत जे पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्नासाठी सज्ज आहेत.

२०२३ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​लग्न करू शकतात. या दोघांच्या रिलेशनशीप २०२२ मध्ये बरेच चर्चेत आले होते. पुढच्या वर्षी दोघे लग्न करू शकतात असे वृत्त आहे.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. असे मानले जात आहे की पुढील वर्षी २०२३ मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकू शकते.

बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरही पुढच्या वर्षी लग्न करू शकतात. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. पुढच्या वर्षी हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या झहीर इक्बालसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोघे लग्न करू शकतात अशी बातमी आहे.

बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. हे सुंदर जोडपे पुढील वर्षी २०२३ मध्ये लग्न करू शकते.