'विवाह'मधील छुटकी आता दिसते खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 09:00 AM2022-01-28T09:00:00+5:302022-01-28T09:00:00+5:30

amrita prakash: विशेष म्हणजे चित्रपटात साध्या पंजाबी ड्रेसमध्ये वावरणाऱ्या छुटकीमध्ये १५ वर्षात कमालीचा बदल झाला आहे.

शाहिद कपूर आणि अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला विवाह चित्रपट साऱ्यांनाच लक्षात असेल. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता.

या चित्रपटातील शाहिद आणि अमृता यांच्या व्यतिरिक्त अन्य कलाकारांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यातल्याचं छुटकीविषयी आज जाणून घेऊयात.

विवाह या चित्रपटात अमृता रावच्या धाकट्या बहिणीची म्हणजेच छुटकीची भूमिका अभिनेत्री अमृता प्रकाशने साकारली होती.

या चित्रपटात अमृता प्रकाशने एका मस्तीखोर,बहिणीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे चित्रपटात साध्या पंजाबी ड्रेसमध्ये वावरणाऱ्या छुटकीमध्ये १५ वर्षात कमालीचा बदल झाला आहे.

अमृता प्रकाश सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अमृताने २००३ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

विवाहपूर्वी अमृता 'कोई मेरे दिल में है' या चित्रपटात झळकली होती. तसंच 'एक विवाह ऐसा भी', 'तुम बिन मिली' या चित्रपटांसह ती अनेक मालिकांमध्येही झळकली आहे.