३ वर्षांची झाली विरुष्काची लेक वामिका, तुम्हाला माहितीये का तिच्या नावाचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:33 AM2024-01-11T11:33:03+5:302024-01-11T11:43:28+5:30

विरुष्काने त्यांच्या लाडक्या परीसाठी खास नावाची निवड केली होती. विराट-अनुष्काने लेकीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं.

अनुष्का-विराटने २०१७ साली विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर ४ वर्षांनी विरुष्काने चाहत्यांना गुडन्यूज दिली.

११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. लाडक्या लेकीबरोबरचे फोटो विरुष्का शेअर करताना दिसतात.

मात्र अद्याप विराट आणि अनुष्काने त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. मीडियापासून विरुष्का त्यांच्या लेकीला दूर ठेवणं पसंत करतात.

विराट-अनुष्काची लेक नक्की कशी दिसते? याबाबत त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

काही दिवसांपूर्वीच विरुष्काच्या लेकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती पाठमोरी डान्स करताना दिसत होती.

विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर 'विरुष्का' हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला होता.

त्यामुळे आपल्या लेकीचं नावही ते विरुष्का ठेवतील, अशी चर्चा सुरू होती.

पण, विरुष्काने त्यांच्या लाडक्या परीसाठी खास नावाची निवड केली होती. विराट-अनुष्काने लेकीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे.

विराटने त्याच्या लेकीच्या नावाचा अर्थही सांगितला होता. वामिका हे दुर्गा देवीचं दुसरं नाव असल्याचं तो म्हणाला होता.

वामिका आता ३ वर्षांची झाली आहे. आज वामिका तिचा तिसरा वाढदिवस साजरा करणार आहे.