काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 02:44 PM2024-02-25T14:44:40+5:302024-02-25T14:57:18+5:30

Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. उर्वशी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

आज तिचा ३०वा वाढदिवस आहे. या वाढदिवसासाठी तिने खास २४ कॅरेट सोन्याचा केक मागवला होता.

उर्वशीने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियवर शेअर केले आहेत. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.

उर्वशीने हा सोन्याचा केक कापत वाढदिवस साजरा केला. आता तिच्या बर्थडेचा हा सोन्याचा केक चर्चेचा विषय बनला आहे.

उर्वशीच्या बर्थडेला लोकप्रिय रॅपर हनी सिंहनेही हजेरी लावली होती. हनी सिंहने उर्वशीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला.

वाढिदवशी उर्वशीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. ज्वेलरी आणि मेकअप करत तिने ग्लॅमरस लूक केला होता.

गेल्या वर्षी उर्वशीने हिरे लावलेला केक बर्थडेसाठी आणला होता. तर सोन्याचे कप केकही होते.

दरवर्षी बर्थडेला लाखो रुपये खर्च केल्याने उर्वशीला ट्रोलही केलं जातं.