समुद्र किनारी गायक गुरू रंधावासोबत रोमांस करताना दिसली उर्वशी रौतेला, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:13 IST2021-04-23T14:13:45+5:302021-04-23T14:13:45+5:30

नुकतेच अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इंस्टाग्राम अकाउंटवर पंजाबी सिंगर गुरू रंधावासोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते आहे. दोघे समुद्रकिनारी बसलेले दिसत आहेत.

उर्वशी रौतेला गुरू रंधावाच्या मांडीवर डोके ठेवून रोमँटिक अंदाजात बसलेली दिसते आहे. उर्वशी रौतेलाचे चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

फोटो शेअर करत उर्वशी रौतेलाने लिहिले की, माझ्या घराचा पत्ता माझ्या शहरातील पागलखाना असेल.

हे फोटो पाहून सध्या उर्वशी गुरूला डेट करतेय की काय असा प्रश्न विचारला जातोय.

खरे तर हे प्रकरण प्रेमाचे आहे पण ते त्यांचे नवीन गाणे डूब गएमधील.

उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावाचे डूब गए हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३६.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

















