उर्वशी रौतेला झळकणार 'थिरुट्टू पायले २' या साउथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 16:37 IST2020-09-16T16:27:51+5:302020-09-16T16:37:40+5:30
उर्वशी रौतेला 'थिरुट्टू पायले २' या साउथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

उर्वशी रौतेला 'थिरुट्टू पायले २' या साउथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
२०१७ साली थिरुट्टे पायले २ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुसी गणेश यांनी केले होते.या चित्रपटात बॉबी सिन्हा, प्रसन्ना आणि अमला पॉल मुख्य भूमिकेत होते.
थिरुट्टे पायले २च्या हिंदी रिमेकचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे शूटिंग वाराणसी व लखनऊमध्ये पार पडले आहे.
उर्वशी अभिनेता विनीत कुमार सिंगसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
उर्वशीने नुकतेच या चित्रपटाचे डबिंग सुरू केले आहे.
या चित्रपटात उर्वशी नॉन-ग्लॅमर आणि देसी भूमिकेत दिसणार आहे.
या व्यतिरिक्त उर्वशी रौतेला हिने हैदराबादमध्ये नुकतेच ब्लॅक रोझ या दाक्षिणात्य सिनेमाचे शूट पूर्ण केले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन संपत नंदी करणार आहेत
यापूर्वी अभिनेताने मिस्टर एअरवाटा नावाच्या कन्नड चित्रपटातही काम केले आहे.
शेवटची ती व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात झळकली होती.
उर्वशीसोबत यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग मुख्य भूमिकेत होते.