कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 07:00 IST2022-04-25T07:00:00+5:302022-04-25T07:00:01+5:30
Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं.

सौरभ शुक्ला हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या अभिनेत्याने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.
सत्यामधील कल्लू मामा असो किंवा Jolly LLB मधील जज, प्रत्येक भूमिका त्यांनी जीवंत केली. त्यामुळेच अल्पावधीत ते लोकप्रिय झाले.
५ मार्च १९६३ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे त्यांचा जन्म झाला. परंतु, त्यांचं संपूर्ण बालपण दिल्लीत गेलं.
दिल्लीतील खालसा कॉलेजमधून त्यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये थिएटर जॉइन केलं.
बँडिट क्वीनच्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. तहकिकत, ९ मालाबार हिल, मुल्ला नसीरुद्दीन या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं.
सौरभ शुक्ला यांना 2014 मध्ये 'जॉली एलएलबी' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं.
बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या सौरभ शुक्ला यांचा गेल्या काही काळातील कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
सौरभ शुक्ला यांचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. अलिकडेच त्यांनी विमल गुटखा जाहिरातीवर एक पोस्ट शेअर केली होती.