तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ! विकी कौशलच्या 'या' तीन गोष्टीमुळे इम्प्रेस झाली कतरिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:46 IST2021-12-06T17:37:29+5:302021-12-06T17:46:49+5:30
कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.

दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक घडामोडी आता समोर येऊ लागली आहे.
लवकरच आता कतरिना विकी कौशलची दुल्हनियाँ बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
लवकरच दोघेही सात फेरे घेत त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत.
विकी कौशल आधी कतरिनाचे नाव सलमान खानसोबत जोडले जात होते.
त्यामुळेच विकी आणि कतरिना दोघांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
ज्याच्यासोबत आपल्याला लग्न करायचे आहे तो मुलगा कसा असावा याविषीय आपले मत क्लिअर असायला हवं.
त्यानंतर ज्याबरोबर आपण लग्न करणार आहोत त्याचं टॅलेंट त्याचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला असावा.
लग्न करणा-या मुलाचा प्रेझेन्स खूप पॉजिटीव्ह असावा.
या तीन गोष्टी कतरिनाला विकीमध्ये दिसल्या आणि त्याच गोष्टींमुळे ती जास्त इम्प्रेस झाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये कतरिनाने या तीन गोष्टी आवडणार त्यासोबत लग्न करणार असल्याचे तिने म्हटले होते.