२०२३ मधील टॉप ५ साऊथ चित्रपट, पहिल्या क्रमांकावर आहे पुष्पा २, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:47 PM2023-01-21T15:47:50+5:302023-01-21T15:47:50+5:30

या लिस्टमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा 2 पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या लिस्टमध्ये ‘सालार’ या चित्रपटाचाही समावेश आहे, अभिनेता प्रभास आणि केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

साऊथ स्टार प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट देखील या यादीत आहे, या चित्रपटात सैफ अली खान आणि क्रिती सॅनन देखील मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

अभिनेता पवन कल्याणच्या हरी हरा वीरा मल्लू या चित्रपटाचाही या यादीत समावेश असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

सुपरस्टार नानी फेम चित्रपट दासरा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करू शकतो, नानी आणि कीर्ती सुरेश या चित्रपटात दिसणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)