सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी केला मेकओव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-28T07:38:33+5:302018-06-27T20:10:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंदर्य आणि त्यांच्या अदांवर रसिक फिदा असतात. काही अभिनेत्रींच्या आकर्षक सौंदर्यात डॉक्टरांचाही विशेष हात असतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कंगणा राणौत, वानी कपूरपासून मिनीषा लांबापर्यंत अशा कित्येक अभिनेत्रींनी अधिक सुंदर दिसण्यासाठी सर्जरीचा आधार घेत मेकओव्हर केला. कुणी ओठ, तर कुणी चेह-याची सर्जरी केली. या मेकओव्हरमुळे मूळ रुपातल्या अभिनेत्रींचं सौंदर्य आणखीन खुलून गेलं. पाहूया कोण आहेत अशा अभिनेत्री.