थरकाप उडवणारे 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून वाचा ही यादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:38 PM2024-04-02T18:38:05+5:302024-04-02T18:53:03+5:30

अ‍ॅक्शन चित्रपटांप्रमाणेच आता भयपट चित्रपटही खूप पसंत केले जात आहेत. अशा चित्रपटांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. भयपट हा सर्वात जास्त आवडलेला जॉनर आहे.

तुम्हालाही जर असे चित्रपट आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा खास चित्रपटांची यादीच घेऊन आलो आहोत.

वर्ष २०२४ मध्ये तुम्हाला खिळवून ठेवणाऱ्या भयपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील पहिलाच चित्रपट म्हणजे "द फर्स्ट ओमन".

२० सेंच्युरी स्टुडिओच्या आगामी सायकोलॉजिकल हॉरर फिल्म 'द फर्स्ट ओमेन'चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा सिनेमा क्लासिक हॉरर फिल्म फ्रँचायझीचा प्रीक्वल आहे. 'द फर्स्ट ओमेन' येत्या ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची कथा ही उत्तमप्रकारे मांडण्यात आली आहे.

विद्या बालनच्या 'भूल भुलैया' आणि कार्तिकच्या 'भूल भुलैया २' नंतर आता 'भूल भुलैया ३'ची घोषणा करण्यात आली आहे. भूल भुलैय्याच्या तिसऱ्या भागात आणखी भयानक प्रसंगांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

हॉरर- कॉमेडी काकुडा फिल्म काकुडामध्ये सुप्रिसद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. या चित्रपटात उत्कंठावर्धक प्रसंग मजेशीर पद्धतीने रेखाटण्याचे काम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.

दरम्यान या चित्रपटाची रिलीझची अचूक तारीख अद्याप घोषित व्हायची आहे, पण डिसेंबर २०२४ पर्यंत हा चित्रपट रिलीझ होईल अशा चर्चा आहेत. कथेचे सर्व भाग गुलदस्यात ठेवण्यात आले आहेत, पण सिन्हा ही सह कलाकार रितेश देशमुख आणि सकिब सलीम यांच्यासोबत दिसणार आहे. काकुडा हा चित्रपट भयाने आणि हास्याने भरलेली सफर असणार आहे.

ए क्वाइट प्लेस: डे वन: दिग्दर्शक आणि अभिनेता जॉन क्रासिंस्कीच्या 'ए काइट प्लेस'ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एमिली ब्लंट आणि जॉनची मुख्य भूमिका असलेल्या विज्ञान-फाई हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळविले होते. 2020 मध्ये या चित्रपटाचा सीक्ेल आला होता, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न निर्माण केले होते. आता याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निर्माते चित्रपटाचा ए क्वाइट प्लेस: डे वन' घेऊन आले आहेत.

समीक्षकांनी गौरवलेला हा चित्रपट माणुसकीच्या विरोधात असणाऱ्या एलेन इनव्हॅशनच्या भयानक सुरुवातीचा पूर्वाध आहे. नवीन भाग आपल्याला एलेन इनव्हॅशच्या सुरुवातीच्या भयानक काळात घेऊन जाणार आहे. हा सिनेमा 28 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती पॅरामाउंट पिक्चर्स, संडे नाइट प्रॉडक्शन्स आणि प्लॅटिनम ड्यून्सकडून करण्यात आली आहे.