PHOTOS :‘द फॅमिली मॅन’ फेम श्रेया धन्वंतरीचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:28 IST2022-11-08T17:16:52+5:302022-11-08T17:28:18+5:30
Shreya Dhanwanthary : अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या मात्र तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे.

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या मात्र तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे.
द फॅमिली मॅन आणि स्कॅम 1992 यासारख्या गाजलेल्या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून श्रेया चर्चेत आली. सध्या तिचे हॉट फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
श्रेयाने टॉपलेस फोटो शेअर करत, इंटरनेटवर आग लावली आहे. पानांच्या आड तिने केलेल्या या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे.
वेगवेगळ्या लुकमध्ये श्रेयाने पोझ दिल्या आहेत. यात तिच्या एक एक अदा वेड लावणाऱ्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो फारच आवडले आहेत.
श्रेया दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहे. पण तिला खरी ओळख दिली ती द फॅमिली मॅन या सीरिजने.
श्रेयाने साऊथ चित्रपटांतून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली. यानंतर ती हिंदी शॉर्ट फिल्म्समध्ये दिसली आणि अचानक ओटीटीवर तिला मोठा ब्रेक मिळाला.
द फॅमिली मॅन, लूप लपेटा, स्कॅम 1992, मुंबई डायरिज मध्ये तिने केलेल्या कामाचं जबरदस्त कौतुक झालं.
अर्थात यासाठी तिला मोठा स्ट्रगल करावा लागला. राहायला घर नाही, अशा स्थितीत उपाशी राहून तिने दिवस काढले.
पहिला सिनेमा मिळण्यासाठी तिला जवळजवळ 10 वर्षे वाट पाहावी लागली. मी खूप स्ट्रगल केला. माझ्याजवळ पैसे नसायचे, राहण्यासाठी घर नव्हतं. पण मी ते सगळं सोसलं, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.