चिमुरड्याने केली होती प्रेक्षकांवर जादू! ८ वर्षानंतर 'असा' दिसतो तुंबाडमधील 'हा' बालकलाकार;आता काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:36 IST2026-02-04T16:24:09+5:302026-02-04T16:36:06+5:30
'तुंबाड'मधील 'हा' बालकलाकार आठवतोय? आता दिसतो हॅण्डमस

तुंबाड सिनेमा भारतातील टॉप हॉरर सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. २०१८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

राही अनिल बर्वेने 'तुंबाड' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. महाराष्ट्रातील एका गावातील स्वातंत्र्यपूर्वी काळातील घटना 'तुंबाड' या चित्रपटामध्ये रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा ही संपूर्णपणे काल्पनिक आहे.तुंबाड या गावात राहणाऱ्या सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक आणि विधवा आई यांच्या भोवती हे कथानक फिरतं.

यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि मोहम्मद समद असे कलाकार होते.

तुंबाड सिनेमात सोहम शाहच्या मुलाची पांडुरंग नावाची भूमिका बालकलाकार मोहम्मद समदने साकारली होती. त्याने या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.या चित्रपटातून या चिमुरड्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

आता मोहम्मद समद चांगलाच मोठा झाला आहे. आता तो खूप हॅण्डसम दिसतो. पण त्याला ओळखणं खूप कठीण झालं आहे.

मोहम्मद समद हा 'तुंबाड' चित्रपटानंतर बरेच हिंदी चित्रपट, वेब सीरीजमध्ये पाहायला मिळाला.सध्या तो मयसभा या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

मोहम्मद सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह आहे. त्याद्वारे तो आपले बरेचसे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असतो.त्यामधील त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत.

















