५७ वर्षीय धकधक गर्लच्या मनमोहक अदा! रेड वेलवेट साडीत बहरलं माधुरी दीक्षितचं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:55 IST2025-02-20T18:48:39+5:302025-02-20T18:55:28+5:30
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे लेटेस्ट साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.

तेजाब सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षितची आजही बॉलिवूडमध्ये तितकीच चर्चेत असते.
लग्नानंतर जेव्हा माधुरी दीक्षित अमेरिकेत स्थायिक झाली होती. तेव्हा तिचे चाहते खूप नाराज झाले होते.
२००६ साली माधुरी दीक्षित भारतात परतली आणि २००७ साली तिने आजा नचले या सिनेमातून दमदार कमबॅक केले.
माधुरीचा फिटनेस आणि सौंदर्य आजही चर्चेत असते.
माधुरी दीक्षितने नुकतेच लाल रंगाच्या वेलवेट साडीत फोटोशूट केले आहे.
या फोटोत माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या मनमोहक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
माधुरी दीक्षितच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.