साऊथची ही बाला बनलीये नवी ‘इंटरनेट सेन्सेशन’! अथुल्या रवीचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 14:38 IST2022-04-24T14:32:34+5:302022-04-24T14:38:43+5:30
Athulyaa Ravi Photos : साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. साऊथच्या या बाला आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देत आहेत. अशीच साऊथची एक ब्युटी म्हणजे अथुल्या रवी.

साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. साऊथच्या या बाला आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देत आहेत. अशीच साऊथची एक ब्युटी म्हणजे अथुल्या रवी.
तामिळ अभिनेत्री अथुल्या रवी हिच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ती ओळखली जाते. साडीतील तिच्या अदाही वेड लावणाºया आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून तामिळ फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह असलेली अथुल्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत ती झळकली आहे.
पलवाडी कढाई या शॉर्ट फिल्ममधून तिचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि 2017 मध्ये तिला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून बधितलं नाही.
Kadhal Kan Kattudhe या डेब्यू सिनेमात ती पहिल्यांदा लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकली. पहिल्याच चित्रपटानंतर तिची चर्चा सुरू झाली.
यानंतर तिच्याकडे निर्माता-दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या. आत्तापर्यंत 10 चित्रपटांत झळकलेली अथुल्या आता तामिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.
सोशल मीडियावर अथुल्या तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
तिच्या मनमोहक हास्यावर चाहते फिदा आहेत. विशेषत: साडीतील तिचे फोटो चाहत्यांना वेड लावतात.
कोइंबतूरमध्ये राहणारी अथुल्या माहिती तंत्रज्ञान विषयात पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राची निवड केली.