"प्रेमात अटी आल्या की ते संपतं...", ब्रेकअपच्या चर्चांवर तमन्ना भाटियाची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:02 IST2025-03-07T12:54:18+5:302025-03-07T13:02:23+5:30

विजय वर्मासोबतचं ब्रेकअप तमन्नाच्या जिव्हारी लागलं.

बीटाऊनमध्ये सध्या विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) ब्रेकअपची चर्चा आहे. २ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

अवॉर्ड फंक्शन, डिनर पार्टी, मू्व्ही स्क्रीनिंग अशा प्रत्येक ठिकाणी हातात हात घालून फिरणारी ही जोडी आता वेगळी झाली आहे. यामुळे त्यांचे चाहतेही निराश झालेत.

तमन्नाला लग्न करायची इच्छा होती आणि विजय त्यासाठी तयार नव्हता म्हणूनच ब्रेकअप झालं अशीही माहिती समोर आली.आता ब्रेकअपच्या चर्चांवर तमन्ना भाटियाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाने नुकतंच ल्यूक कॉटिन्होच्या पॉडकास्टवर हजेरी लावली. यावेळी प्रेमावर ती म्हणाली, "अनेक लोक प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये गोंधळतात याची मला नुकतीच जाणीव झाली.

असं फक्त गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यातच नाही तर मैत्रीमध्येही होतं. जेव्हा प्रेमात अटी-शर्थी येतात तिथे प्रेम संपतं असं मला वाटतं. प्रेम हे नि:स्वार्थीच असलं पाहिजे."

ती पुढे म्हणाली,"प्रेम कायम एकतर्फी असतं. दोन जण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांवर प्रेम करु शकतात पण हे एकतर्फीच काम असतं. तुमचं प्रेम वेगळं आणि त्यांचं प्रेम वेगळं."

जर मी कोणावर प्रेम करते तर मी त्या माणसाला मोकळं सोडलं पाहिजे. तुम्ही तुमचे विचार दुसऱ्यांवर लादून प्रेम करु शकत नाही. समोरचा जसा आहे आणि यापुढे तो जसाही असेल तसाच तुम्हाला आवडतो म्हणून तर तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता.

कारण लोक कायम जसे आहेत तसेच राहत नाहीत. मला कायम एकटं राहण्यापेक्षा रिलेशनशिपमध्ये राहायलाच आवडलं आहे. फक्त मी कोणासोबत आहे हेही महत्वाचं आहे.

कारण लोक कायम जसे आहेत तसेच राहत नाहीत. मला कायम एकटं राहण्यापेक्षा रिलेशनशिपमध्ये राहायलाच आवडलं आहे. फक्त मी कोणासोबत आहे हेही महत्वाचं आहे.