भगव्या कपड्यांत मॅटर्निटी फोटोशूट करणं महागात पडलं, स्वरा भास्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले,"बुरखा कुठे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:40 PM2023-09-16T12:40:30+5:302023-09-16T12:54:35+5:30

लग्नानंतर काहीच महिन्यांत गरोदर असल्याची बातमी दिल्यामुळे स्वराला ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा मॅटर्निटी फोटोशूटमुळे स्वरा ट्रोल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्वराने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. लग्नानंतर काहीच महिन्यांत गरोदर असल्याची बातमी दिल्यामुळे स्वराला ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा मॅटर्निटी फोटोशूटमुळे स्वरा ट्रोल झाली आहे.

स्वरा सध्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावरुन ती गरोदरपणातील अनेक फोटो शेअर करत असते. नुकतंच स्वराने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्वराने भगव्या रंगाचा गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे.

या फोटोमध्ये स्वराने बेबी बंप फ्लाँट केल्याचंही दिसत आहे. मॅटर्निटी फोटोशूटसाठी स्वराने छान पोझही दिल्या आहेत. या फोटोला तिने “प्रेग्नन्सीला फॅशन बनवा. ग्लॅमरसाठी प्रेग्नन्सी हा चांगला काळ आहे,” असं कॅप्शन दिलं आहे. पण, मॅटर्निटी फोटोशूटसाठी भगव्या रंगाचे कपडे घातल्याने नेटकऱ्यांनी स्वरा भास्करला ट्रोल केलं आहे.

स्वराचं हे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यावर अनेकांनी कमेंटही करत तिला ट्रोल केलं आहे. “तुझा बुरखा कुठे आहे?” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “भगवा बॅकग्राउंड...अंध भक्तांना अजून किती बदनाम करणार”, अशी कमेंट केली आहे.

“बॅकग्राउंड बदल...तुला भगवा रंग आणि देशापासून एलर्जी आहे”, अशी कमेंट करत स्वरा भास्करला ट्रोल केलं आहे.

“ही सनातनी संस्कृती नाही आहे,” असंही एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे. स्वरा भास्करच्या चाहत्यांच्या मात्र हे फोटोशूट पसंतीस उतरलं आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोशूटवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

स्वरा भास्करने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहादबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न केल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली होती. स्वराच्या या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

कोर्ट मॅरेजनंतर स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला होता. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले होते.

स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधीही स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनला उपस्थित होते. स्वरा व फहादचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. आता ते लवकरच आईबाबा होणार आहेत.