'सूर्यवंशम'मधील हीरा ठाकूरची गौरी सध्या कुठेय? दोन लग्न मोडली, आता मुलासोबत जगतेय असं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 17:41 IST2024-11-09T17:37:36+5:302024-11-09T17:41:27+5:30
'सूर्यवंशम'मधील हीरा ठाकूरची गौरी कुठे गेली? जाणून घ्या तिच्याबद्दल

१९९९ साली आलेला सूर्यवंशम आजही तितकाच लोकप्रिय बॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमातील हीरा ठाकूरची सक्सेस स्टोरी चाहत्यांना भावली होती.
या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री सौंदर्या राधाच्या भूमिकेत होती. याच सिनेमात रचना बॅनर्जी यांनी गौरीची भूमिका साकारली होती.
सूर्यवंशममध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रोमँटिक गाणंही केलं होतं.
रचना यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तमिळ, तेलुगु, बंगाली, कन्नड भाषिक सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत.
पण, त्यांना म्हणावी तितकी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अभिनयाला रामराम केला.
पण, आता त्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत. रचना एक बिजनेस वुमन असून त्यांचा स्वत:चा कॉस्मेटिक ब्रँड आहे.
रचना यांना वैवाहिक आयुष्यातही सुख मिळालं नाही. त्यांनी सिद्धांत मोहापात्राशी लग्न केलं होतं. मात्र २००४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
त्यानंतर २००७ साली प्रबल बसू यांच्याबरोबर त्यांनी दुसरा संसार थाटला. मात्र त्यांचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे.
रचना बॅनर्जी या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 873K फॉलोवर्स आहेत.