सनी लिओनीने सुरूवात केली 'अनामिका'च्या शूटिंगला, दिसणार अॅक्शन करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 11:49 IST2020-12-22T11:49:03+5:302020-12-22T11:49:03+5:30

अभिनेत्री सनी लिओनीने आगामी प्रोजेक्ट अनामिकाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.
अनामिकाचे दिग्दर्शन विक्रम भट करणार आहे.
सनी लिओनी विक्रम भट यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे.
अद्याप हे स्पष्ट झाले नाही की अनामिका चित्रपट आहे की वेबसीरिज
सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने अनामिकाच्या सेटवर क्लिपबोर्ड पकडलेला दिसतो आहे.
सतनाम..एका नवीन कामाला सुरूवात होते आहे आणि माझा लॉकडाउन संपत आहे, विक्रम भटसोबत नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे.
लॉकडाउननंतर सनी लिओनीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. (सभी फोटो इंस्टाग्राम)