PHOTOS: श्रीदेवीची मुलगी जाह्नवी कपूरने जुहूमध्ये विकत घेतला बंगला, किंमत ऐकून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 12:03 PM2021-01-06T12:03:28+5:302021-01-06T12:03:28+5:30

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने मुंबईच्या जुहू भागात कोट्यवधीचे घर खरेदी केले आहे. (Photo Instagram)

जुहूमधल्या इमारतीत 3456 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर जान्हवीने तब्बल 39 कोटींना विकत घेतले. (Photo Instagram)

यासाठी स्टँप ड्युटीपोटी तिने 78 लाख रुपये भरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात 6 कारच्या पार्किंगची जागा आहे. (Photo Instagram)

जान्हवीच्या नावावर आत्तापर्यंत केवळ दोन सिनेमे आहेत. (Photo Instagram)

जान्हवीने 2018 साली ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या सिनेमात ती झळकली आहे. (Photo Instagram)

यावर्षी जान्हवी राजकुमार रावसोबत ‘रूही अफजाना’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

कार्तिक आर्यनसोबत ‘दोस्ताना 2’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. (Photo Instagram)

याशिवाय करण जोहरचा मल्टीस्टारर ‘तख्त’ हा सिनेमाही तिने साईन केला आहे. (Photo Instagram)