रजनीकांत यांची थोरली लेक ऐश्वर्या वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये, कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 04:46 PM2023-03-20T16:46:30+5:302023-03-20T17:35:17+5:30

रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून 60 तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहे. त्यामुळे ऐश्वर्याचं नेटवर्थ चर्चेत आलं आहे.

Aishwarya Rajinikanth: रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी चोरी झाली आहे. चेन्नईमधल्या घरातून डायमंड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. या दागिन्यांची किंमत जवळपास ३.६० लाख रुपये असून २०१९ मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नात ऐश्वर्याने हे दागिने वापरले होते. (फोटो इन्स्टाग्राम)

हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, अनकट डायमंड्स, अँटिक गोल्ड दागिने, नवरत्न सेट, अँटिक अनकट डायमंड आणि गोल्ड, आरम नेकलेस आणि बांगड्या यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात हे दागिने वापरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. (फोटो इन्स्टाग्राम)

ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून 60 तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहे. त्यामुळे सध्या ऐश्वर्याचं नेटवर्थ चर्चेत आलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या रजनीकांतचे नाव साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि पार्श्वगायिका आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रजनीकांत दरवर्षी 30 ते 35 कोटी रुपये कमावते.(फोटो इन्स्टाग्राम)

चेन्नई व्यतिरिक्त ऐश्वर्या रजनीकांतची इतर शहरांमध्येही आलिशान घरे आहेत, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

ऐश्वर्याकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे, त्यात मर्सिडीज बेंझ ८० कारची किंमत सुमारे २ कोटी आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

यावरून तुम्ही सहज अंदाज लावू शकता की ऐश्वर्या रजनीकांत किती लक्झरी लाइफस्टाइल जगते.(फोटो इन्स्टाग्राम)