नाद करा, पण सोनम कपूरचा कुठं? बॉसी लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 04:30 PM2024-01-26T16:30:47+5:302024-01-26T16:41:12+5:30

बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि तिची स्टाईल या नेहमीच चर्चेच्या विषयांमध्ये असतात.

सोनम कपूर ही एक सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

नुकतेच सोनम कपूरने 'फायटर'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी ती बॉस लेडी लूकमध्ये दिसली.

स्क्रिनिंगला पोहचण्यापुर्वी सोनमने पती आनंद आहूजासोबत रोमँटिक फोटोशुट केलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

आनंद आहूजा आणि सोनमची ही जोडी खूप सुंदर दिसत आहे.

पँट सूटमध्ये सोनम अगदी सुंदर दिसत आहे.

चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जिओ सिनेमावर तिचा ब्लाइंड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.