अभिनेत्री सोनम कपूरचा स्टायलिश लूक, फोटो पाहिलेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:32 IST2024-04-16T16:21:33+5:302024-04-16T16:32:47+5:30

सोनम कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच सोनम तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते.

अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अनेक तरुणी सोनमची स्टाईल कॉपी करताना दिसून येतात.

सोनम कपूर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनमच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

सोनम कपूरनं वेस्टर्न आउटफिटमधील खास फोटो शेअर केले आहेत. यातील सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती दोन वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

सोनम कपूर पांढऱ्या शर्टसह फुल स्कर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर एका फोटोमध्ये तिने मॅचिंग स्कर्ट टॉप घातला आहे.

सोनम कपूरच्या स्टायलिश स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे.

सोनम कपूरचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सोनाक्षीच्या या फोटोंना अल्पावधीतच खूप पसंती मिळाली आहे.

सोनमने तिचे बॅक टू बॅक फोटो शेअर करत केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

लवकरच अभिनेत्री आणखी दोन बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण, तिच्या सिनेमांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.