'या' अभिनेत्यानं मुस्लीम असूनही हिंदू रितीभाती जपल्या, शुभा खोटे म्हणाल्या, "श्रावण महिन्यात तो…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:44 IST2025-09-11T18:29:33+5:302025-09-11T18:44:22+5:30
शुभा खोटे यांनी लोकप्रिय अभिनेत्याबद्दल केलेला खुलासा सध्या चर्चेत आलाय.

शुभा खोटे या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शुभा यांनी मराठीसह हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत
अनेक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं.
पण, शुभा खोटे यांची एका बॉलिवूड अभित्यासोबत जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना आवडायची.
ते अभिनेते होते मेहमूद. शुभा खोटे आणि मेहमूद यांच्यात खूप चांगली मैत्री होती. दोघांनी १९५०-६० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
शुभा खोटे आणि मेहमूद यांच्या जोडीने विनोदी भूमिकांना एक वेगळी उंची दिली.
नुकतंच रेड एफएम पॉडकास्टमध्ये मेहमूद (Shubha Khote on Mehmood) यांच्या आठवणीला उजाळा देताना शुभा खोटे यांनी एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला.
शुभा खोटे यांनी सांगितले, "मी जेव्हा श्रावण महिन्यात सोमवारी आणि शनिवारी उपवास करायचे, तेव्हा मेहमूद माझ्यासोबत उपवास करायचे. आणि जेव्हा ते रमजानमध्ये शुक्रवारी रोजा ठेवायचे, तेव्हा मीदेखील त्यांच्यासोबत रोजा ठेवायचे."
शुभा खोटे म्हणाल्या, "आम्ही एकत्र इतकं काम केलं होतं की, आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांच्या रितीभातींचे पालन करू लागलो होतो".