शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:03 PM2024-02-20T18:03:24+5:302024-02-20T18:07:45+5:30

Shraddha kapoor: मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूरची लेक प्रेमात पडली असून ती एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे.

उत्तम अभिनयशैली आणि मराठी ठसकेबाजपणा यामुळे लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर.

आपल्या हटके अंदाजामुळे श्रद्धा अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे तिचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

श्रद्धाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या लव्ह लाइफविषयी जाणून घेण्या

श्रद्धा कधी लग्न करणार, ती कोणाला डेट करतीये का या आणि अशा कितीतरी चर्चा सोशल मीडियावर कायम रंगत असतात. यामध्येच तिच्याविषय़ी एक मोठी माहिती समोर येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूरची लेक प्रेमात पडली असून ती एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे.

श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायक दर्शन रावल याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. श्रद्धा गेल्या काही काळापासून सातत्याने दर्शनची गाणी शेअर करत आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे दर्शन सुद्धा श्रद्धाच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर लाइक्स आणि कमेंट करत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष आणखीनच वेधलं गेलं आहे.

सध्या तरी श्रद्धा किंवा दर्शन यांनी या चर्चांवर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती सत्यता आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.